Skip to content Skip to main navigation Skip to footer

लर्निंग नॅव्हिगेटर ओळख

Table of Contents

लर्निंग नॅविगेटर हे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सध्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या कोणत्याही प्रकारच्या शिकण्याच्या व शिकविण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने बनविण्यात आले आहे. आपण जर प्राथमिक शिक्षक असाल, विद्यार्थी असाल किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी जरी असाल तरीही लर्निंग नॅविगेटरच्या सहाय्याने तुम्ही कोणताही विषय शिकू किंवा शिकवू शकता.

लर्निंग नॅविगेटरची निर्मिती ही गुगल मॅपच्या निर्मितीच्या तत्वांच्या आधारे करण्यात आली आहे. गुगल मॅप हे आपले स्थान (लोकेशन) हे पृथ्वीच्या अक्षांश-रेखांशच्या आधारे निश्चित करून घेते. त्याचपद्धतीने लर्निंग नॅविगेटरहे प्रत्येक विषयातले मुलांचे नेमके स्थान ‘क्षमतांच्या संरचनेच्या’ (Competency Framework) आधारे निश्चित करून देते. गुगल मॅप वर आपण जसे ‘डेस्टीनेशन’ (इच्छित स्थळी पोहोचण्याचे स्थान) निश्चित करतो त्याचप्रमाणे आपणा सर्वांनाच मुलांचे, अध्य्यानार्थींना जे अंतिम ध्येय साध्य करायचे आहे म्हणजेच अध्ययनाचे जे ध्येय आहे ते माहित असते.वर्गातील मुलांचे शिकण्यातील ‘लोकेशन’ (सध्याचे स्थान) सुद्धा आपल्याला ढोबळमानाने माहिती असू शकते. लर्निंग नॅविगेटरमार्फत आपल्याला हे स्थान अधिकाधिक नेमकेपणाने , क्षमता निहाय कळण्यास मदत होते. त्यामुळेच लर्निंग नॅविगेटरमधील ही क्षमतांची संरचना ही लर्निंग नॅविगेटरचा कणा मानली जाते.

गुगल मॅप आपणाला इच्छित स्थळी (डेस्टीनेशनला) पोहोचण्यासाठी रस्त्यात किती वाहतुकीची कोंडी आहे, डेस्टीनेशनला पोहोचण्यासाठी जवळचा रस्ता कोणता आहे तसेच साधारणपणे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे इत्यादी माहिती आपणास सहज उपलब्ध करून देते.

त्याचप्रमाणे शिक्षकांना त्यांच्या वर्गातील प्रत्येक मुलाचे क्षमताआधारित स्थान (लोकेशन) क्षमतांच्या संरचनेच्या आधारे समजले तर शिक्षकाला त्यांच्या वर्गातील मुल सध्या कुठे आहे आणि कुठे न्यावयाचे आहे त्यानुसार प्रत्येक मुलाला/अध्ययनार्थींना इच्छित स्थळी (डेस्टीनेशन) पोहोचवण्यासाठी लर्निंग नॅविगेटरची निर्मिती करण्यात आली. यासाठी लर्निंग नॅविगेटरमधील संसाधने, उपक्रम इत्यादीच्या सहाय्याने नॅविगेटर शिक्षक आणि मुले यांना मार्गदर्शन करते. मूल्यमापनाच्या सहाय्याने मुल / अध्ययनार्थी हे त्यांच्या अध्ययन वाटचालीत कशी प्रगती करत आहेत याबद्दल त्यांना चालू काळात माहिती देते.

शिक्षक हा वर्गप्रक्रिया घडविण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा घटक आहे यावर आपला ठाम विश्वास आहे. लर्निंग नॅविगेटरचा हेतू हा शिक्षकांची जागा घेणे हा नसून त्यांना वर्गप्रक्रियेत मदत करणे हा आहे. शिक्षकांना चालू काळात खालील माहितीचे विश्लेषण उपलब्ध झाल्यास : 

१) एखाद्या ठराविक क्षमतेत मुलाला प्रभुत्व प्राप्त झाले आहे की नाही किंवा त्या क्षमतेत मुलाला अजूनही समस्या येत आहे का यासंदर्भाने प्रत्येक मुलाचे निश्चित ‘स्थान’ ओळखणे शक्य होईल.

२)    वर्गनिहाय क्षमता प्राप्त करताना वर्गाची प्रगती कशी होत आहे हे समजून घेता येईल.

३) प्रत्येक मुल ज्या पद्धतीने, गतीने शिकत आहे त्यानुसार प्रत्येक क्षमतेसाठी उपलब्ध अभ्यासक्रमातील संसाधने वापरण्याचे नियोजन शिक्षकांना करता येते.

लर्निंग नॅविगेटरमधील संसाधने खुले स्त्रोत असून संसाधने तयार करताना शिकण्याची तत्वे लक्षात घेऊनच ही संसाधने तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक क्षमतेसाठी शिक्षक सहभाग उपक्रम, गटशिक्षण उपक्रम, वर्कशीट, व्हिडीओ, सराव प्रश्न आणि मूल्यमापन तयार करण्यात आले आहेत. अर्थात लर्निंग नॅविगेटर हे निव्वळ संसाधनांचे भांडार असणारे तंत्रज्ञान नाही. तसेच निव्वळ माहितीचे व्यवस्थापन करण्याचे साधन नाही. इतर ‘लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम्स’ पेक्षा  लर्निंग नॅविगेटरचे वेगेळे पण हेच आहे की शिक्षण व्यवस्थेतील संपूर्ण यंत्रणेस एकात्मिक पद्धतीने काम करता येईल या दृष्टीने याची रचना केलेली आहे. लर्निंग नॅविगेटरच्या सहाय्याने (शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रस्तर ते राज्यस्तरावरील शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी) शाळा व्यवस्थापन समित्या यांना त्यांच्या केंद्रातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील मुलांना कोणत्या क्षमतांमध्ये समस्या येत आहेत व या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांची या प्रक्रियेत कशी मदत होईल हे समजण्यास मदत ठरणार आहे.

लर्निंग नॅविगेटरमध्ये जसे शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी अभ्यास साहित्य उपलब्ध आहे तसेच क्षमताआधारित अभ्यास साहित्य तयार करण्यासाठीची सुविधा ही उपलब्ध आहे. यासाठी लर्निंग नॅविगेटरच्या ‘साहित्य निर्मिती’ करणाऱ्या प्लॅटफॉर्मचा (Content Building Platform) वापर करून अभ्यास साहित्य तयार करता येते. साहित्य निर्माते (Content Developers) हे क्षमता निहाय अशा अभ्यास साहित्याची निर्मिती लर्निंग नॅविगेटरवर करू शकतात. त्यांनी तयार केलेल्या साहित्याच्या सहाय्याने मुलांना अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यास काही मदत होते आहे की नाही म्हणजेच त्यांच्या संसाधन आणि मुल्यमापनाची कार्यक्षमता ही येथे तपासता येते. याचबरोबर अध्ययन निष्पत्ती आणि त्यांनी तयार केलेले अभ्यास साहित्य परस्पर पूरक आहे की नाही ; त्यांच्या साहित्याचा वापर  लर्निंग नॅविगेटरवर किती प्रमाणात होत आहे याबाबत चालू काळात प्रतिसादही (Real Time Feedback) त्यांना मिळत राहतो.

Was This Article Helpful?

0 Comments

There are no comments yet

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *