Skip to content Skip to main navigation Skip to footer

प्रगती रेषा निर्मिती

Table of Contents

‘Student Locator’ हे मुलांची प्रभुत्व पातळी दर्शवते. याच ठिकाणी मुलांच्या प्रगतीचे 3 वेगवेगळे अहवाल उपलब्ध आहेत. ते म्हणजे:

 1.  CLASS PROFICIENCY REPORT: वर्गाचा मूलनिहाय प्रगती अहवाल
 2. DOMAIN COMPETENCY REPORT: अध्ययन क्षेत्रनिहाय प्रगती अहवाल
 3. CLASS PROGRESS REPORT: वर्गाचा साप्ताहिक प्रगती अहवाल

प्रगती रेषा

प्रत्येक मुलाची प्रगती रेषा पाहण्यासाठी वरील चित्रात दाखवलेल्या मुलांच्या नावावर क्लिक करून पाहता येऊ शकते. खालील इमेज पहा:

वर दिलेल्या आलेखात:

 • X’ अक्षावर दाखवल्याप्रमाणे जे १ ते ७ आकडे आहेत ते क्षेत्रे असून त्यानुसार मुलाच्या त्या क्षेत्रातील प्रगतीचा अहवाल बघता येतो.
 • इयत्ता १ली ते ५ वी पर्यंतच्या क्षमतांचा हा आलेख असून मूल कोणत्याही इयत्तेत असले तरी पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात ते कोणत्या टप्प्यावर आहे हे येथे लक्षात येते.
 • आलेखातील प्रत्येक स्तंभावर २ रंगांच्या रेषा दिसतात. त्यापैकी;
 1. हिरवी रेषा (अपेक्षित पातळी/Hi line) मुल सध्या ज्या वर्गात/इयत्तेत आहे त्याची अपेक्षित पातळी दर्शवते.
 2. पांढरी रेषा (प्रगती रेषा/Sky-line) सध्या ते मूल कोणत्या टप्प्यावर आहे ते दर्शवते.
 3. या रेषांमधील अंतर हे मुलाची सद्य स्थितीआणि अपेक्षित पातळी यातील तफावत दर्शवते. याच्याआधारे मुलाला एखाद्या क्षमतेमध्ये नक्की अडचण कुठे आली आहे हे समजते त्याचप्रमाणे मुलाचे वैयक्तिक नियोजन करण्यास मदत होते. 
 4. जेव्हा हिरवी आणि पांढरी रेषा म्हणजेच अपेक्षित पातळी आणि प्रगती रेषा एकसमान असते त्याचा अर्थ असा होतो कि त्या मुलाने त्या इयत्तेमधील अपेक्षित क्षमता अवगत केल्या आहेत.
 • मुलांचा प्रगती अहवाल अधिक विस्तृतपणे पाहण्यासाठी वरील इमेजमधील लाल वर्तुळात दाखवलेले निळ्या बटणावर क्लिक करून पाहता येऊ शकतो.

क्षमता

 • विस्तृत अहवाल खालील प्रकारे दिसतो.
 • अहवालातील प्रत्येक स्तंभातील चौकोन हे क्षमता दर्शवतात.
 • पुढील इमेजमध्ये पिवळ्या रेषेने दाखवल्याप्रमाणे स्तंभातील एक चौकोन ज्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करतो ती क्षमता दिसते (डेस्कटॉप व्यू मध्ये उजवीकडे तर मोबाईल व्यू मध्ये नव्या स्क्रीनवर).
 • क्षमतेच्या खाली तीन पर्याय दिसतात
 1. Portfolio(मुलांच्या कामाचे संकलन (शिक्षकाने मुलांन बरोबर केलेले काम)
 2. Metadata (मेटाडेटा (क्षमतेविषयीची अधिकची माहिती)
 3. Learning Map(अध्ययन नकाशा)-मुलाने नेव्हीगेटरवर केलेले काम

‘Metadata’ येथे क्लिक केले असता त्या क्षमतेच्या सूक्ष्म क्षमताही उपलब्ध आहेत. 

 • चौकोनाचा गडद निळा रंग म्हणजे त्या मुलाने ती क्षमता अवगत केली आहे. फिकट निळा रंग म्हणजे ते मुल त्या क्षमतेवर काम करत आहे आणि ज्या ठिकाणी राखाडी रंग आहे त्या ठिकाणी अजून त्या क्षमतेवर काम सुरु झालेले नाही. 
 • गडद निळा रंग असणारी क्षमता म्हणजेच प्रभुत्व प्राप्त झालेली क्षमता २ पद्धतीचे प्रभुत्व दर्शवतात.
 1. Mastered (Earned): स्वत: त्या क्षमतेवर काम करून मिळवलेली क्षमता.

उदा: इयत्ता ३ रीच्या वर्गामध्ये ३ अंकी संख्यांची बेरीज ही क्षमता आहे. तर मुल ३ अंकी संख्यांची बेरीज कशी करायची हे शिकते त्याचा सराव करते आणि ती क्षमता त्याला अवगत होते. 

 1. Mastered (Inferred): अनुमानित प्रभुत्व म्हणजेच ज्या क्षमतांचे प्रभुत्व हे इतर क्षमतांच्या प्रभुत्वांतर्गत गृहीत धरलेले आहे.

उदा: इयत्ता २ रीच्या मुलाला जर २ अंकी बेरीज करता येते याचाच अर्थ असा आहे कि त्याची १ अंकी बेरीजेची संकल्पना स्पष्ट आहे.

Was This Article Helpful?

0 Comments

There are no comments yet

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *